भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी,दि.7 (जि.मा.का.)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण,विभाग येथे शनिवार दिनांक 16 एप्रिल पर्यंत सामाजिक समता अशा विविध आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली. जिल्ह्यातील महाविद्यालये, शासकीय वसतिगृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांवर आधारित विद्यार्थ्याकरिता वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व लघुनाट्य स्पर्धांचे तसेच आश्रमशाळेमध्ये अनुक्रमे प्राचार्य, गृहपाल व मुख्याध्यापक यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोज करुन स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत . ज्या महाविद्यालयांमध्ये स्पर्धा घेण्यात आलेल्या नाहीत अशा महाविद्यालयातील संबंधित प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयात गुरुवार दिनांक 14 एप्रिल 2022 पर्यंत विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व लघुनाट्य स्पर्धा आयोजित करुन कार्यक्रम घेण्याबाबत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याबाब समाज कल्याण विभागाने आवाहन केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'