मार्जिन मनी योजनेअंतर्गत कार्यशाळा सपन्न

सिंधुदुर्गनगरी,दि.13 (जि.मा.का.)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त राज्यभर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहाअंतर्गत समाज कल्याण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय ,सिंधुदुर्ग येथे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांच्या उपस्थितीत अनुसूचित जातीच्या सहकारी औद्योगिक संस्थांना अर्थसहाय्याची योजना व मार्जिन मनी योजनेअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस सिंधुविकास शेडुल्ड कास्ट इंडस्ट्रियल को-ऑफ सोसायटी लि. शिवडाव चे अध्यक्ष अजित तांबे व सचिव किरण गावकर यांनी अनुसूचित जातीच्या सहकारी औद्योगिक संस्थांना अर्थसहाय्याची योजना याबाबत मार्गदर्शन करुन जैविक कोळसा निर्मितीबाबत माहिती सांगितली. तसेच त्यांच्या संस्थने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील 70 महिलांना आजअखेर रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली असून यापुढेही रोजगारीची संधी जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करुन देणेचे सांगितले. असे समाज कल्याण विभागामार्फत कळविले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'