आण्णासाहेब पाटील महामंडळाची व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा सुरू
सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जिमाका) :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित, मुंबई मार्फत राबविण्यात येणाऱ्य वैयक्तिक तसेच गट कर्ज योजनांतील लाभार्थ्यांना अधिक सुलभ, पारदर्शक व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने Whats App Chatbot सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली आहे.
लाभार्थ्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा सुरु करण्यात आली असून Whats App मध्ये अर्जाची स्थिती, मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या सेवा "One Clik Information" या संकल्पनेअंतर्गत विकसित करण्यात आली असून, लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जासंबंधित माहिती व विविध प्रक्रियांची स्थिती आता थेट Whats App वरुन तत्काळ प्राप्त होणार आहे.
या Chatbot सुविधेव्दारे लाभार्थ्यांना पुढील सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत:- 8976855921 या क्रमांकावर Hi असे लिहिल्यास मेनू पर्याय उपलब्ध होतील. या पर्यायानुसार खाली दिलेले पर्याय समोर येतील. त्यापैकी संबंधित पर्यायाची निवड करुन पुढे जावे. महामंडळ व योजनांची माहिती, नवीन नोंदणी संदर्भातील मार्गदर्शन, पात्रता पमाणपत्र (L.O.I) स्थिती व डाऊनलोड सुविधा, बँक कर्ज मंजुरी (Sanction) स्थिती, व्याज परतावा दावा (Claim) स्थिती. तांत्रिक अडचणी नोंदविणे व त्यासंबंधित Ticket Generation सुविधा उपलब्ध आहे.
या सर्व सेवा OTP आधारित सुरक्षित पडताळणी करुन लाभार्थ्यांना सुविधा मिळणार आहेत. स्वयं नोदणी L.O.I बँक Sanction व व्याज परतावा दावा करीता मार्गदर्शनासाठी प्रशिक्षण व्हिडिओ WhatsApp bot मध्ये उपलब्ध असून विभागीय कार्यालय, Dco संपर्क माहिती "One Click" वर प्राप्त होणार आहे.
या प्रणालीमुळे लाभर्थ्यांना कार्यालयीन भेटी कमी होऊन ऑनलाईन सुविधेमुळे अर्ज प्रिक्रियेमध्ये पारदर्शकता व गतीमानता येईल. शिवाय, लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती "एकाच चॅटमध्ये" उपलब्ध होत असल्याने वेळ व खर्चाची बचत होणार आहे.या सुविधेमुळे लाभार्थ्यांचे अनधिकृत एजंट वरील अवलंबित्व कमी होईल.
महामंडळामार्फत यापूर्वीच लाभार्थ्यांच्या सोयीसाठी अधिकृत Mobile App देखील उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. सर्व लाभार्थ्यांनी उपलब्ध डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त वापर करुन योजनांचा लाभ सुलभ पध्दतीने घ्यावा, या सोबतच Digitalization व्दारे Mobile App मार्फत L.O.I, Sanction व Claim च्या सुविधा लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
अधिक सोईसाठी महामंडळाच्या वेब प्रणालीवर लाभार्थ्याच्या व्यवसाय विस्तारासाठी "व्यवसायवर्धन" टॅब सुरू करण्यात आलेला असून, लाभार्थ्यांना त्यांनी त्यांची उत्पादने व सेवा पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने महामडळाच्या प्रणालीवर प्रसिध्द करावीत. ज्यामुळे त्यांच्या सेवा व उत्पादनांची माहिती अधिकाधिक ग्राहकांपर्यत पोहोचेल. याच माध्यमातून लाभार्थ्यांना विक्री व खरेदीचे व्यासपीठ तयार करण्याची "E-Market Place" ची सुविधा भविष्यात उपलब्ध करुन देण्यासाठी महामंडळ पयत्नशील आहे. यामुळे लाभार्थ्याच्या व्यवसयात वृध्दी होण्यास मतदन होईल.
दरम्यान, भविष्यात whatsApp माध्यमातूनच L.O.I अर्ज प्रक्रिय उपलब्ध करून देण्याबबत महामंडळ स्तरावर कायवाही सुरू असून लाभार्थ्यांना अधिक सुलभ व गतिमान सुविधा देण्यचा महामंडळचा पयत्न आहे. सर्व लाभार्थ्यांनी Whats App Chatbot व Mobile App चा वापर करुन डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा.
००००००
Comments
Post a Comment