शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज ३१ मे पूर्वी निकाली काढण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.२७ (जि.मा.का):- शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाडिबीटी प्रणालीची व्हर्जन 2.0 कार्यान्वित होणार असल्याने, सन 2019-20 ते 2025-26 मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज दि. 31 मे 2026 पर्यंत तात्काळ निकाली काढावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार महाडिबीटी प्रणालीचे व्हर्जन २.० सुरू होत आहे. नवीन प्रणालीमध्ये डेटा हस्तांतरण यशस्वी करण्यसाठी जुन्या प्रणालीवरील सर्व प्रलंबित कामकाज पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील
http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरू आहे.
जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्राचार्च, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करण्यात येते की, ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी स्तरावर तसेच महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्यास असे शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज दि. ३१ मे २०२६ पर्यंत त्वरीत निकाली काढवे. सदर अर्ज दि. ३१ मे २०२६ नंतर शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज प्रलंबित राहिल्यास तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहील्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य यांची राहील.
तसेच महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जाची छाननी करुन परिपूर्ण अर्ज मंजुरीस्तव या कार्यालयाकडे वर्ग करण्याबाबत संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य यांनी तात्काळ कार्यकावही करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात येत आहे.
०००००००
Comments
Post a Comment