सातारा येथे 23 मे रोजी माजी सैनिकांसाठी मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्ग नगरी, दि.20 (जिमाका):- स्टेशन हेडक्वार्टर कोल्हापूर यांच्यावतीने व 109 MARATHA INF BN (TA) यांच्या वतीने माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/ वीर नारी/वीर माता-पिता यांच्यासाठी श्रीमंत छत्रपती अभयसिंग राजे भोसले बहुउद्देशीय सभागृह, सातारा येथे दिनांक 23 मे 2026 रोजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. या मेळाव्यात माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी,वीरमाता व वीरपिता यांच्या विविध समस्या जसे निवृत्ती वेतन, स्पर्श प्रणालीत (SPARSH Portal) येणाऱ्या अडचणीचे निरसन, रोजगार विषयक मार्गदर्शन, वीरनारी वीरमाता व वीरपिता यांना मिळणाऱ्या सुविधा यावर मार्गदर्शन होणार आहे. तसेच विविध बँकांचे स्टॉल तसेच मेडिकल कॅम्पचे (Eye Spl, Ent, Spl, SURG SPI, Ortho Spi, Gen Medicine & ECHS) आयोजन करण्यात आले आहे. तरी मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता वीरपिता यांनी या मेळाव्यात 23 मे 2026 ला सकाळी 8 वाजता श्रीमंत छत्रपती अभयसिंगराजे भोसले बहुउद्देशीय सभागृह सातारा येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'