शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून रोजी

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यातील सहा परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता पेपर क्रमांक 01 साठी 1 हजार 903 उमेदवार तर पेपर क्रमांक दोन साठी 2 हजार 209 उमेदवार असे एकूण 4 हजार 112 उमेदवार बसणार असल्याची माहिती जिल्हा परीक्षा आयोजन व सनियंत्रण समितीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. जिल्ह्यात 4 हजार 501- कासार्डे हायस्कूल कासार्डे, 4 हजार 502- कणकवली कॉलेज कणकवली,4 हजार 503- विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली, 4 हजार 504 कुडाळ हायस्कूल कुडाळ, 4 हजार 505- शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा, 4 हजार 506 -एस.एम. हायस्कूल कणकवली, या सहा परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व सनियंत्रण समितीची परीक्षेच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली .या बैठकीत परीक्षा नियोजनावर चर्चा करण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या पूर्वतयारीबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांनी दिली. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'