सावंतवाडीत 22 मे रोजी रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जिमाका) :- जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग तथा मॉडेल करिअर सेंटर व जयानंद मठकर व औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा Manufacturing Sector साठी दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 3 या वेळेत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी अ. ई. तडवी यांनी दिली आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार असून विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराचा संधी उपलब्ध होणार आहे. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या कंपन्या व उपलब्ध पदांचा तपशील पुढील प्रमाणे Crompton पात्रता: दहावी/बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी Helper पदाचे 80 जागा असून पात्रता : आयटीआय टर्नर, फिटर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन उमेदवारांसाठी 80 जागा. MRF पात्रता : आयटीआय, टर्नर, फीटर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशन पदासाठी 50 जागा. KalambaAgro पात्रता: आयटीआय (टर्नर, फिटर, मशिनिस्ट,वेल्डर, इलेक्ट्रिशन) पदासाठी पाच जागा. Om Ganesh Electricals पात्रता: आयटीआय इलेक्ट्रिकल्स पदासाठी पाच जागा, QualityTechnical Solutions, Verna,Goa ज्युनियर टेक्निशियन /जुनियर इंजिनियर पदाचे 10 जागा, पात्रता: आयटीआय इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल्स, वेल्डर, फिटर, वायरमन, इन्स्ट्रुमेंटशन सदर रोजगार मेळाव्यासाठी दहावी/ बारावी तसेच आयटीआय सर्व ट्रेड उत्तीर्ण उमेदवार पात्र राहतील. निवड झालेल्या उमेदवारांना अंदाजे 17 हजार ते 20 हजार पर्यंत मासिक वेतन मिळण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात उपस्थित राहताना अद्ययावत Resume/Bio-Deta, शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रति, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक युवक -युवतीने या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आव्हान जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे केंद्राचे अ. ई. तडवी यांनी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'