सैनिक वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृहासाठी विविध पदांची भरती

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्त्याखाली असलेल्या सैनिकी मुलांचे वसतीगृह, सावंतवाडी व माजी सैनिक विश्रामगृह, मालवण येथे व्यवस्थापनासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने एकंदरीत मानधनावर माजी सैनिक प्रवर्गातून नागरी संवर्गातून एकूण 9 अशासकीय पद भरावयाची असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. सावंतवाडी येथील सैनिकी मुलांचे वसतिगृहासाठी सहाय्यक वसतिगृह अधीक्षक-1, पहारेकरी-1 माळी-1 सफाई कामगार-1 आणि स्वयंपाकी (महिला)-3 या पदांसाठी भरती होणार असून, मालवण येथील माजी सैनिक विश्रामगृहासाठी पहारेकरी-1 व सफाई कामगार-1 असे एकूण 9 पदांची भरती केली जाणार आहे. सहाय्यक वसतिगृह अधीक्षक पदासाठी मासिक मानधन सुमारे २४ हजार ८७५ रुपये असून पहारेकरी पदासाठी २० हजार २६५ रुपये मानधन देण्यात येणार आहे. तसेच माळी व सफाई कामगार पदांसाठी १२ हजार ६७५ रुपये तर स्वयंपाकी पदासाठी १३ हजार ५१० रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. री इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी सैन्यसेवा पुस्तक, ओळखपत्र, आणि नागरी उमेदवारांनी 2 फोटो, आधार कार्ड या कागदपत्रांसह दिनांक 30 मे 2026 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत भेट देऊन स्वत: अर्ज सादर करावेत. माजी सैनिक प्रवर्गातून उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी संवर्गातून सदर अशासकीय पदे भरण्यात येतील याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी कामाचे स्वरुप कामाचा अवधी दुरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दरे केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'