महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अर्ज भरण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दिनांक 7 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 ही रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे. या परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचा कालावधी दि. 15 सप्टेंबर 2025 ते 3 ऑक्टोंबर पर्यंत होती. परंतु महाराष्ट्रत काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पुरस्थिती निर्माण झाल्याने परीक्षार्थी, उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणींना सामोरे जावे लागल्याने परीक्षार्थी, उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी दि. 4 ते 9 ऑक्टोंबर 2025 रात्री 11.59 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच विद्यार्थी, उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भरता न आल्यामुळे संबंधित परीक्षार्थी, उमेदवारांना नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डव्दारे दि. 9 ऑक्टोंबर 2025 रोजी रात्री 11.59 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. संबंधित परीक्षार्थी, उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. ००००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'