जिल्ह्यात 5 ते 8 ऑक्टोंबर या कालावधीत हलक्या व मध्यम पावसाची शक्यता या कालावधीत नागरिकांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 4 (जिमाका) :- राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त संदेश तसेच प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार अरबी समुद्रात शक्ती नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात ४ ऑक्टोंबर २०२५ रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे या कालावधीत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच ५ ते ८ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागने वर्तविलेली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी (१) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. (२) दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. (३) विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. (४)विजेच्या खांबांपासून लांब रहावे. (५) विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. (६) विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. (७) धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. (८) वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP’ डाऊनलोड करून घ्यावे. (९) पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी १) मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. २) अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा व पायी अथवा वाहनाने प्रावास करु नका. ३) घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या. ४) पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहु नये, मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तुंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. ५) मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. अ.क्र. नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक १ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (०२३६२)२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ ७४९८०६७८३५ २ जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष (०२३६२)२२८६१४ / ८२७५७७६२१३ पोलीस विभाग टोल फ्री हेल्पलाईन – ११२ ३ जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग (०२३६२)२२८९०१ ४ महावितरण, सिंधुदुर्ग नियंत्रण कक्ष ७८७५७६५०१९ ५ दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष (०२३६३)२५६५१८ /७५५८६७३४६८ ६ सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष (०२३६३)२७२०२८/९४२०९१४५२४ ७ वेंगुर्ला तालुका नियंत्रण कक्ष (०२३६६)२६२०५३/९४२०८५१८०५ ८ कुडाळ तालुका नियंत्रण कक्ष (०२३६२)२२२५२५ / ८२७५२२३१४२ ९ मालवण तालुका नियंत्रण कक्ष (०२३६५)२५२०४५ १० कणकवली तालुका नियंत्रण कक्ष (०२३६७)२३२०२५ ११ देवगड तालुका नियंत्रण कक्ष (०२३६४)२६२२०४/८८५७८३७२०४ १२ वैभववाडी तालुका नियंत्रण कक्ष (०२३६७)२३७२३९/८८३०४६२१८२ हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२)२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'