तक्रार समिती गठीत करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 13 (जिमाका):- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम,2013 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या अधिनियमांचे कलम 4 अन्वये ज्या कार्यालयांमध्ये 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी असतील अशा सर्व खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बा.भि शिणगारे यांनी दिली आहे. आस्थपनेंतर्गत तक्रार समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करणे बाबतचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम,2013 च्या कलम 23 नुसार कार्यालयाअंतर्गत तक्रार समिती गठीत न केल्यास, वार्षिक अहवाल सादर न केल्यास अथवा या अनिनियमातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन न केल्यास (अंतर्गत समितीचे गठन न केल्यास ) नियोक्त कार्यालयप्रमुख यांना 50,000/ (रु. पन्नास हजार ) पर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हाच गुन्हा पुन्हा केल्यास त्यासाठी लायसन्स रद्द किंवा दुप्पट दंड अशा कठोर शिक्षेची तरतूद आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापना तसेच इंटरप्रायझेस मध्ये ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी असतील अशा सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंनाने अंतर्गत तक्रार समिती गठीत करुन खाली नमूद केलेल्या कार्यपध्दतीचा वापर करावा. या समितीचा नोंदणी SHE BOX PORTAL वर करण्यात यावी. SHE BOX PORTAL वर अंतर्गत तक्रार समिती नोंदविण्याची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे https://shebox.wcd.gov.in या वेबसाईटवर जा. Private head office registration या tab वर Click करा. आवश्यक त्या सर्व माहितीचा अचूक तपशील भरा. Submit या Tab वर Click करुन माहिती नोंदवा. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग प्रशासकीय इमारत येथे संपर्क साधावा. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'