‘दिव्यांग बालक सक्षमीकरण’ शिबीर संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का.) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिव्यांग बालकांची ओळख / तपासणी करण्यासाठी जिल्हयामध्ये दिनांक २७ सप्टेंबर, 2025 रोजी दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीराचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश विद्या देशमुख, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, सावंतवाडी तालुका वकील संघ अध्यक्ष बाळाजी रणशूर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत राबविल्या जाणा-या विविध योजना व सेवा, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गमार्फत दिव्यांग बालकांसाठी मोफत ओळख व तपासणी तसेच आरोग्य तपासणी, आरोग्य विभागामार्फत दिव्यांग बालकांचे आभाकार्ड/आयुष्यमान कार्ड काढणे, तहसिलदार कार्यालय, सावंतवाडी मार्फत दिव्यांग बालकांना जातीचे दाखले देणे, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, सावंतवाडी, यांच्यामार्फत नेत्र तपासणी व पोस्ट ऑफिस, सिंधुदुर्गमार्फत नवीन आधार नोंदणी व आधारकार्ड अद्ययावत करणे तसेच शासनामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनां याबाबतचे स्टॉल लावण्यात आले होते. शिबीरामध्ये दिव्यांग बालकांना व्हिलचेअरचे व दिव्यांग प्रमाणपत्र व युनिक आयडीचे वाटप करण्यात आले. सदर शिबरामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व दिव्यांग बालकांनी लाभ घेवून शिबीराची शोभा वाढविली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांनी जिल्हयातील दिव्यांग बालक हे शासनाच्या कोणत्याही लाभापासून वंचित राहू नये याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, , जिल्हाधिकारी कार्यालय, व जिल्हा परिषद यांच्या समन्वयाने जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील असेदेखील सांगितले. सदर कार्यक्रमामध्ये दिव्यांग बालक, त्यांचे पालक, शिक्षक, शासकीय अधिकारी कर्मचारी असे एकूण ५०० हून अधिक लोक उपस्थित होते. या शिबीरामध्ये सर्व न्यायिक अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हयातील वकील वर्ग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग, तालुका विधी सेवा समिती, सावंतवाडी, तालुका वकील संघ, सावंतवाडी, अध्यक्ष व सदस्य, बाल कल्याण समिती, सिंधुदुर्ग, तहसिलदार कार्यालय सावंतवाडी, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग, पोस्ट ऑफिस, सिंधुदुर्ग, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, सावंतवाडी व समेट विधी सेवा केंद्र, ओरोस बुद्रुक या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लायन्स क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष व सदस्य, रोटरी कृब, सावंतवाडीचे अध्यक्ष व सदस्य, दिव्यांगासाठी काम करणा-या शासकीय/अशासकीय संस्थाचे अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हयातील दिव्यांगांसाठी काम करणा-या सर्व शासकीय शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच दिव्यांग बालक व त्यांचे पालक हे देखील उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संपूर्णा गुंडेवाडी यांनी प्रस्तावना केली. प्रभारी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, सावंतवाडी रंजना कुंभार व अॅड. तालुका वकील संघ, महिला उपाध्यक्षा सावंतवाडी सिध्दी परबयांनी सुत्रसंचालन केले अॅड. संकेत नेवगी यांनी उपस्थित मान्यवर व अधिकारी यांचे आभार मानले. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'