समन्वयक म्हणुन नाव नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 7 (जिमाका) :- जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैन्य अधिकारी यांनी शासनाकडून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अल्पकालीन अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सिंधुदुर्ग येथे नाव नोंदणी करण्याचे, आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
शासनाकडून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संख्या व शासकीय तांत्रिक विद्यालय यामध्ये असणाऱ्या पायाभूत सुविधांचा सदुपयोग करुन अधिकाधिक कुशल मनुष्यबळ निर्मिती करावयाची असल्याने या संस्थामध्ये स्थानिक गरजेनुसार अल्पकालीन अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. हे अभ्यासक्रम शासनाकडून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या संख्या व्यवस्थापन समितीव्दारे दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ पासुन चालविण्यात येणार आहेत. त्याकरीता लष्करी सेवेनंतर सेवनिवृत्त झालेल्या सशस्त्र दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा या अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या प्रभावी संचलनासाठी व्हावा, असा शासनाचा मानस आहे.
जिल्ह्यातील इच्छुक सेवा निवृत्त सैन्य अधिकारी यांनी आपल्या नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अल्पकालीन अभ्यासक्रमाच्या अतिरीक्त वर्गाचे समन्वयक म्हणून दररोज ४ ते ६ तास आपली सेवा देण्यासाठी या कार्यालयात आपले नाव त्वरीत नोंद करावयाचे आहे. त्याकरीता त्यांना वाजवी मानधन देण्यात येईल, असे कळविले आहे. याबाबतची अधिक माहीती min.skills@maharashtra.gov.in या ईमेलवर देण्यात आली आहे किंवा स्वीय सहाय्यक विजय देवरे, ९९८७१४००५८ या Wtsp क्रमांकावर संपर्क करु शकता. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२३६२-२२८८२०/९३२२०५१२८४ वर संपर्क करावा.
०००००
Comments
Post a Comment