अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे आभासी उद्घाटन संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये रोजगारक्षम अल्पमुदतीचे अभ्यासक्रमांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने उद्घाटन संपन्न झाल्याची माहिती ओरोस येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे, प्राचार्य ए.एस.मोहारे यांनी दिली आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवी मुंबई विमानळाच्या उद्घाटनाचा थेट प्रक्षेपण उपस्थित प्रमुख मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, शाळांचे शिक्षक व विद्यार्थी यांना दाखविण्यात आला. त्यानंतर अल्पमुदतीच्या उद्घटनाचा कार्यक्रमाचा Live देखिल सर्व उपस्थित मान्यवर अधिकारी, प्रशिक्षणार्थी, शाळांचे विद्यार्थी यांना दाखविण्यात आला. या कार्यक्रमास सुमारे 300 प्रशिक्षणार्थी शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे प्राचार्य, ए.एस.मोहारे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे गटनिदेशक श्री.गोरे यांनी केले. पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस येथे सुरु करण्यात येत असलेल्या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे जिल्हा उद्योग केंद्राचे, व्यवस्थापक श्रीपाद दामले तसेच कुडाळ एमआयडीसी चे प्रोप्रायटर, जानविका डिडाईन, लीलाधर मेस्त्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास खादी ग्रामोद्योगक विकास मंडळाचे अधिकारी कुरुंदवाडे , जिल्हा कौशल्य, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी अमिन तडवी, समिती संस्था व्यवस्थापन आयटीआय चे सदस्य गोविंद परब शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'