शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेशाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 1 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष सन 2025-26 करीता इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने 26 ऑक्टोबर, 2025 पर्यंत अर्ज https://hmas.mahail.org या संकेतस्थळावर भरावा. भरलेल्या अर्जाची एक प्रत सहायक संचालक, इतर मागास बहून कल्याण, सिंधुदुर्ग या कार्यालयाकडे जमा करावी असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण चे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावयायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी जिल्ह्यात इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृह, बांधकरवाडी कणकवली येथे सुरु झाले आहे.
या वसतीगृहात सन २०२५-२६ साठी अभ्यासक्रमनिहाय व जात प्रवर्गनिहाय रिक्त जागा दर्शविणारे विवरणपत्र खालील प्रमाणे.
अ.क्र
प्रवर्ग
एकुण आक्षण
व्यवसायिक अभ्यासक्रम
बिगर व्यवसायिक
अभ्यासक्रम
व्यवसायिक
अभ्यासक्रम रिक्त जागा
1
इतर मागास वर्ग
51%
22
9
22
2
विमुक्त जाती व भटक्या जमाती
33%
14
6
14
3
विशेष मागास प्रवर्ग
6%
3
1
3
4
दिव्यांग
4%
2
-
2
5
अनाथ
2%
1
-
1
6
आर्थिक मागास प्रवर्ग (EWS)
4%
1
1
1
एकुण
100
43
17
43
वसतीगृह प्रवेशाकरीता नियम व अटी-
विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशष मागासप्रवर्गाचा जातीचा दाखला तसेच इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल, विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे. (तहसिलदार यांचेकडील उत्पन्न दाखला), या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे, उच्च शिक्षणासाठी (व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये गुणवत्तेनूसार तसेच, संबंधित प्रवर्गनिहाय विहित आरक्षणानूसार प्रवेश देण्यात येईल. याकरीता इयत्ता १२ वीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल.
००००
Comments
Post a Comment