शिरोडा- वेळागर समुद्रातील घटना • आज 2 पर्यटकांचे मृतदेह मिळाले • मृतांची एकुण संख्या- 5 • 2 पर्यटक अद्यापही बेपत्ता

सिंधुदुर्गनगरी दिनांक 4 (जिमाका) :- काल दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा - वेळागर येथील समुद्रात सायंकाळी 8 पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. या पर्यटकातील 4 जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले होते. यातील 3 पर्यटक मयत असून एक पर्यटक (महिला) श्रीमती. इसरा इमरान कित्तूर, वय 17 रा. लोढा, बेळगाव हिला वाचविण्यात यश आलेले होते. तीन मयत पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे 1. श्रीम. नहिदा फरीन इरफान कित्तूर, वय 34, रा. लोंढा, बेळगाव (मयत) 2. श्री. इबाद इरफान कित्तूर , वय 13, रा. लोंढा, बेळगाव (मयत) 3. श्रीमती नमीरा अफताब अख्तार, वय 16, रा. अल्लावर, बेळगाव (मयत) बेपत्ता पर्यटकांची शोध घेण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शोध माहिमेत 4 ऑक्टोंबर रोजी पुढील 2 पर्यटकांचे मृतदेह शोध व बचाव पथकास मिळालेले आहेत. 1. श्री. इकवान इमरान कित्तूर, वय 15, रा. लोढा, बेळगाव (मयत) 2. श्री. फरहान मोहम्मद मणियार, वय 20 रा. कुडाळ, सिंधुदुर्ग (मयत) उर्वरित बेपत्ता पर्यकांची नावे पुढीलप्रमाणे 1. श्री. इरफान मोहम्मद इसाक, कित्तूर, वय 36, रा. लोंढा, बेळगाव 2. श्री. जाकीर निसार मणियार,वय 13, रा. कुडाळ, सिंधुदुर्ग घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. शोध व बचाव मोहिमेसाठी कोस्टगार्ड रत्नागिरी यांची मदत देखील घेण्यात येणार आहे. तरी कृपया नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 00000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'