‘प्लास्टिक व ई- वेस्ट संकलन स्पर्धे’चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 13 (जि.मा.का) :- पर्यावरण संवर्धन, स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातुन दिनांक 15 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ‘प्लास्टिक व ई- वेस्ट संकलन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व शाळानी व जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख स्वच्छ सुंदर जिल्हा तसेच पर्यटन जिल्हा म्हणुन आहे. यामुळेच पर्यटकांची रेलचेल मोठ्याप्रमाणात आहे. जिल्ह्यातील रस्त्यावर प्लस्टिक बॉटल, रॅपर असा प्लस्टिक कचरा दिसुन येतो. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ व सुंदर दिसावा या करीता जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन ­‘प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन स्पर्धा’ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक 15 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळाच्या माध्यमातून गावातील प्लॉस्टिक बॉटलचा कचरा एकत्र करण्यात येणार आहे. या स्पर्धेत तालुक्यात सर्वात जास्त प्लास्टिक बॉटल गोळा करणाऱ्या उत्कृष्ट शाळाचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शाळेमध्ये सर्वात जास्त प्लास्टिक बॉटल गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हि सन्मान जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. "प्लास्टिक व ई- वेस्ट संकलन स्पर्धेच्या" दरम्यान जमा होणारे प्लास्टिक शिवप्रतिज्ञा बहुद्देशिय सेवाभावी संस्था, मिरज जि. सांगली यांच्या माध्यमातून गोळा करुन पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व शाळानी सहभाग नोंदवावा अशा सुचना देण्यात आल्या आहे. तसेच या कार्यक्रमांत जिल्हावासियांनी सहभाग घेतल्यास पहिला पर्यटन जिल्हा, पहिला स्वच्छ जिल्हा त्याप्रमाणे पहिला प्लास्टिक बंद म्हणुन आपला जिल्हा नव्याने ओळख निर्माण करु शकेल असा विश्वास यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी व्यक्त केला आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'