कुष्ठरोग शोध मोहीम जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि.14 (जिमाका) : जिल्ह्यात एलसीडीसी (LCDC) कुष्ठरोग शोध मोहीम दिनांक 17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी स्वेच्छेने स्वतःची कुष्ठरोगांबाबत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद येथे जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील डॉ. कुष्ठरोग सहाय्यक संचालक सतीश गुजलवार, व सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष माडगे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी निलेश मठकर इतर समन्वय समिती सदस्य आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एलसीडीसी (LCDC) कुष्ठरोग शोध मोहीमे अंतर्गत जिल्ह्यात एकूण 607 पथकामार्फत 7 लाख 79 हजार 434 लोकसंख्येचे कुष्ठरोग आजाराचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. कुष्ठरोग शोध मोहिमेत घरोघरी येणाऱ्या सर्व्हेक्षण पथकामार्फत सर्वांनी आपल्या शरीराची कुष्ठरोगाबाबत तपासणी करून घ्यावी, आरोग्यपथकास सहकार्य करावे. या मोहिमेच्या अनुषंगाने आरोग्य शिक्षण उपक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून जिल्हा कुष्ठमुक्त करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. शासनाच्या गॅझेटनुसार कुष्ठरोग हा नोटीफायवल आजार म्हणून घोषित करण्यात आलेला असल्यामुळे सर्व कुष्ठरुग्णाची नोंद शासकीय दवाखान्यात करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सात दिवसांच्या आत्त नजीकच्या सरकारी दवाखान्यात रुग्णाची नोंद करणे आवश्यक आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'