जिल्ह्यात 5 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
सिंधुदुर्गनगरी, दि.२१ (जि.मा.का):- जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी 12 वाजल्यापासून ते दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी 24 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
स्थानिक संस्था निवडणूक -2025 नगरपरिषद सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण तसेच नगरपंचायत कणकवली यांच्या निवडणुक कार्यक्रम दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मतदार व दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीची दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे.
निवडणुकीचे काळात सर्व राजकिय पक्ष आपले वर्चस्व प्रस्तावित करण्यासाठी, मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात, निवडणुक प्रचारादरम्यान राजकिय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणे, वर्तमानपत्रामध्ये वारंवार एकमेकांवर टिका टिप्पणी करणे, सोशल्य मिडीयावर एकमेकांविरुध्द माहिती प्रसारीत करणे, राजकीय पक्षांमधील किरकोळ वादाचे, आरोप प्रत्यारोपांचे एखाद्या घटनेत होवून, तणाव निर्माण होवून त्यातून कायदा व सुव्यसस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आगामी काळात गावा गावांमध्ये यात्रा उत्सावाची सुरुवात झालेली आहे.
वैयक्तीक व सामाईक मागणीकरीता उपोषणे मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येत, अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्यची शक्यता नाकारता येत नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक – २०२५ चे अनुषंगाने सोशल मिडीयावर व्यायरल होणारे आक्षेपार्ह पोस्ट, तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रस्ता रोको या सारख्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये. जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्याच्या संपुर्ण भूभागात मनाई आदेश लागू करण्यात येत आहे.
वरील कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.
कलम ३७ (१) नुसार
१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा
करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.
२) अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.
३) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा
करणे किंवा तयार करणे.
४) व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे
समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)
५) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.
६) सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग
आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.
कलम ३७(३) नुसार
१) सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे.
२) हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न, धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .
वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.
00000
Comments
Post a Comment