थकबाकीदार लाभार्थींनी एक रकमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्मेचा एक रक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के रक्कम सवलत देण्याबाबतची एक रकमी परतावा (OTS) योजना 31 मार्च 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा येऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागास वर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती आर पटेल यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादीत मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग अर्थिक विकास महामंडळ लि. जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत मुदत कर्ज, बीज भांडवल कर्ज, स्वर्णिमा कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना इ. कर्ज योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदारने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'