वन्यहत्ती "ओंकार"च्या वावर असलेल्या भागात गर्दी करु नये
सिंधुदुर्गनगरी दिनांक 06 (जिमाका) :- हत्तीला कोणत्याही प्रकारे त्रास होईल किंवा इजा होईल असे वर्तन करुन नये. वन्यजीवांचे संरक्षण करणे हे सर्वाचे कर्तव्य आहे. त्यामुळे वन्यहत्ती "ओंकार" चे वावर असलेल्या भागात गर्दी करुन नये, असे अहवान वनविभागातर्फ करण्यात आले आहे.
सावंतवाडी तालुक्यात वन्यहत्ती "ओंकार" याचा वावर सुरु आहे. तो सातोसे, कास, मडुरा, रोणापाल, ओटवणे, विलवडे, भालावल, तांबोळी,डेगवे, वाफोली, इन्सुली व बांदा या गावांच्या परिसरात दिसून येत आहे. हा हत्ती भातशेती, फळबागायती क्षेत्र तसेच काही ठिकाणी वस्ती परिसरातही फिरतांना आढळला आहे. या वन्यहत्तीला मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक अधिवासात राखण्यासाठी वनकर्मचारी व जलद बचाव पथक सातत्याने देखरेख ठेवत आहेत.
वन्यहत्तीचा वावर असलेल्या ठिकाणी काही ग्रामस्थ व बाहेरुन येणारे लोक हत्ती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. गर्दी नियंत्रणासाठी पोलीस विभागाची मदत घेण्यात येत आहे. तथापि, काही नागरिक हत्तीच्या अगदी जवळ जावून फोटो काढणे, व्हिडीओ तयार करणे, हत्तीवर हात ठेवणे किंवा काठीने मारणे या सारख्या कृती करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्याक्तींचा शोध घेवून त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हे नोंदविण्याची कारवाई सुरु आहे.
००००००
Comments
Post a Comment