राष्ट्रीय लोक अदालतीचे 13 डिसेंबरला आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत शनिवार १३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली आहे. सन २०२५ या वर्षातील चौथी लोक अदालत आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयातील तडजोपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमून घेण्याबाबत पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे. तडजोड होऊ शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी १३ डिसेंबर च्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवायची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवायचे आहे,असे संबंधित अधिक्षक अथवा लिपिक आणि संबंधित वकीलाना कळवावे. लोक अदालतीत तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, क्षुल्लक वादाचे पर्यावसान कायमस्वरुपी वादात होणार नाही, वैराने वैर वाढतच राहते असे होऊ नये,यासाठी सामंजस्य घडवावे हाच लोक अदालतीचा हेतू आहे.लोक अदालतीतील निकालाविरुद्ध अपिल होत नाही.वेळ आणि पैशाची बचत होते. या लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोपाञ स्वरुपाची फौजदारी, कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे इ.प्रकरणे ठेवायची असल्यास संबंधित वकीलाना कल्पना द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, डॉ. सुधीर देशपांडे यांनी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'