सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने पदयात्रेचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी,दि.19 (जि.मा.का):- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने जिल्ह्यात शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता कुडाळ शहरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मेरा युवा भारतचे उपसंचालक कालिदास घाटवळ यांनी दिली आहे.
या पदयात्रेचा मार्ग, कुडाळ हायस्कुल कुडाळ, मैदान –पोलीस स्टेशन, गांधी चौक बाजार, एस.टी. स्टॅण्ड ते एस.आर.एम कॉलेज, कुडाळ हायस्कुल कुडाळच्या मैदानावर समारोप होणार आहे.
युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत सन 2025 हे वर्ष भारताचे लोहपुरुष राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणुन साजरे केले जात आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधुन राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 या दरम्यान संपुर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जाणार आहेत. या पदयात्रा प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केल्या जाणार आहेत. त्यासोबत स्वच्छता मोहिम, स्वदेशी मेळे, व्यसनमुक्ती मोहिम, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांवर चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा इ. आयोजित केल्या जाणार आहेत. या उपकमात महाविद्यालय, शाळा, स्थानिक युवा संघटना, माय भारत, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि बीएसजी युनिट्स यांचा सहभाग असणार आहे.
00000
Comments
Post a Comment