महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 तपासणी नाक्यावरील पथकांनी अधिक दक्ष राहण्याचे निर्देशराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची इन्सुली तपासणी नाक्याला भेट

सिंधुदुर्ग नगरी दि ९ (जिमाका) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी इन्सुलि येथील तपासणी नाक्याला (चेक पोस्ट) भेट देऊन कार्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व तपासणी नाक्यावरील पथकांनी अधिक दक्ष राहण्याचे निर्देश दिले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एम डी शेवरे व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आढावा बैठक घेऊन अडीअडचणी समजून घेतल्या. जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवरील पथकाने दक्ष राहावे, गोवा राज्यातून येणारे अवैद्य मद्य यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री शेवरे यांनी विभागाने केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले आचारसंहिता लागू झाल्यापासून ते ९ नोव्हेंबर पर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण ४४ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये १० वाहनासह एकूण ६९ लाखाचा मुद्देमाल जप्त करून ४४ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ०१ एप्रिल २०२४ ते आतापर्यंत ३८८ गुन्ह्यात ४ कोटी ८४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती श्री शेवरे यांना यावेळी दिली. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'