महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे चिन्ह वाटप
सिंधुदुर्गनगरी दिनांक 5 नोव्हेंबर 2024 (जिमाका) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ असून या निवडणुकीसाठी 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहेत.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह (कंसात)
268 - कणकवली विधानसभा मतदार संघात 06 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यात चंद्रकांत आबाजी जाधव- बहुजन समाज पार्टी- (हत्ती), नितेश नारायण राणे- भारतीय जनता पार्टी- (कमळ), संदेश भास्कर पारकर- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)- ( मशाल), गणेश अरविंद मान- अपक्ष- (ट्रक), नवाझ ऊर्फ बंदू खानी- अपक्ष- (बॅट), संदेश सुदाम परकर- अपक्ष- (चिमणी) यांचा समावेश आहे.
269- कुडाळ विधानसभा मतदार संघात 05 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यात कसालकर रवींद्र हरिश्चंद्र- बहुजन समाज पार्टी- (हत्ती), नाईक वैभव विजय- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)- (मशाल), निलेश नारायण राणे- शिवसेना -(धनुष्यबाण), अनंतराज नंदकिशोर पाटकर- महाराष्ट्र स्वराज्य पार्टी- (पेनाची निब सात किरणांसह), उज्वला विजय येळाविकर- अपक्ष -(शिट्टी) यांचा समावेश आहे.
270 सावंतवाडी विधानसभा मतदार संघात 06 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दिपक वसंतराव केसरकर - शिवसेना- (धनुष्यबाण), राजन कृष्णा तेली- शिवसेना- (उध्दव बाळासाहेब ठाकरे)- (मशाल), अर्चना घारे परब- अपक्ष- (लिफाफा), दत्ताराम विष्णू गांवकर- अपक्ष -(शिवण यंत्र), विशाल प्रभाकर परब- अपक्ष -(गॅस शेगडी), सुनिल ऊर्फ यशवंत वसंत पेडणेकर- अपक्ष- (फलंदाज) यांचा समावेश आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.
00000
Comments
Post a Comment