मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

सिंधुदुर्गनगरी दि 7 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी जिल्ह्यातील 268- कणकवली विधानसभा मतदार संघ, 269- कुडाळ मतदार संघ,270- सावंतवाडी मतदार संघात बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या-त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, याकरीता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतदान दिवशी भरविण्यात येणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याकरीता बुधवार दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील खाली नमूद केलेले आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी निर्गमित केल आहेत. तसेच या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात आलेली आहे. अ.क्र तालुका दि.20/11/2024 रोजी मतदान दिवशी आठवडा बाजार बंद करण्याचे गावाचे नाव 1 देवगड मिठबांव, शिरगांव 2 वैभववाडी वैभववाडी शहर बाजारपेठ 3 कणकवली कोळोशी 4 कुडाळ कुडाळ शहर बाजारपेठ 5 मालवण पोईप, मसदे 6 सावंतवाडी आरोस 7 वेंगुर्ला आडेली 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'