शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी 6 (जि.मा.का) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यातील 4 परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2024चे जिल्हा परिरक्षक यांनी दिली आहे. या परीक्षेकरीता पेपर क्र.01 साठी 936 उमेदवार व पेपर क्र.2 साठी 1 हजार 122 उमेदवार असे एकूण 2 हजार 58 उमेदवार बसणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4501 एस. एम. हायस्कूल कणकवली, 4502 विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, 4503 कुडाळ हायस्कुल कुडाळ, 4504 कणकवली कॉलेज कणकवली या केंद्रावर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा, जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती अध्यक्ष अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती उपाध्यक्ष मकरंद देशमुख यांच्या उपस्थितीत परीक्षेच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षा नियोजनावर चर्चा करण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या पूर्व तयारीबाबत केलेल्या कार्यवाहीची माहीती जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव, तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी दिली. या बैठकीस सदस्य तथा शिक्षणाधिकारी (माध्य.) श्रीम. कविता शिंपी, शिक्षणाधिकारी (योजना) सदस्य श्रीम. निलीमा नाईक, तसेच जिल्हा परिरक्षक, झोनल अधिकारी, सहा, परिरक्षक, व केंद्रसंचालक आदी उपस्थित होते. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'