कणकवली तालुक्यातील मौजे तळेरे येथे विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनरी ( जि.मा.का) दि. 30 – कणकवली तालुक्यातील मौजे तळेरे येथील चाफर्डेवाडी मधील चंद्रकांत आत्माराम तळेकर यांचे घर ते प्रशांत जनार्दन पारकर यांचे घर हा संपूर्ण परिसर 34 घरे, 64 कुटुंबे व 259 लोकसंख्या, तळेरे बाजारपेठ येथील निलेश अरविंद तळेकर घर ते बँक ऑफ महाराष्ट्र हा संपूर्ण परिसर, विश्वविद्या कॉम्प्लेक्स ते सूर्यकांत तळेकर यांचे घर आणि भांबुरे चाळ ते परशुराम महाडिक यांचे घर हा संपूर्ण परिसर 95 घरे, 93 कुटुंबे व 339 लोकसंख्या, तळेरे गावठाण येथील पारकर चाळ ते डॉ. सुखानंद भागवत दवाखाना हा संपूर्ण परिसर 66 घरे, 85 कुटुंबे व 235 लोकसंख्या एकूण 500 मीटर परिघ एकुण 195 घरे, 252 कुटुंबे व 833 लोकसंख्या असलेला परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 12 जुलै 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
मालवण तालुक्यातील मौजे वायंगणी- भंडारवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनरी ( जि.मा.का) दि. 30 – मालवण तालुक्यातील मौजे वायंगणी- भंडारवाडीच्या 300 मीटर परिसरात कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 10 जुलै 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे - जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.
00000
Comments
Post a Comment