सावंतवाडी गोदामात प्राप्त डाळींचे वितरण


    सावंतवाडी गोदामात प्राप्त डाळींचे वितरण
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 24 : माहे एप्रिल ते जून- 2020 या महिन्यांकरीता पंतप्रधान गरीब कल्‍याण अन्‍न योजना (PMGKAY) अंतर्गत जिल्‍हयामध्ये मोफत तूरडाळ व चणाडाळीची दिनांक 30 एप्रिल 2020 रोजी मागणी करण्यात आली होती. याप्रमाणे तूरडाळ, चणाडाळ व एकूण मागणी  मे.टनात अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे. माहे एप्रिल तूरडाळ- 75, चणाडाळ- 111, एकूण 186 असे होते. माहे- मे मध्ये तूरडाळ-75, चणाडाळ- 111, एकूण- 186 असे होते. माहे जूनमध्ये तूरडाळ- 75, चणाडाळ- 111,  एकूण 168 इतके होते.  
            मागणी करण्यात आलेल्‍या डाळींपैकी प्राप्‍त झालेल्‍या डाळींचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. चणाडाळ-73.500 मे. टन व तूरडाळ- 115.000 मे. टन इतकी प्राप्त झाली आहे. माहे एप्रिल ते जून-2020 करीता मागणी करण्‍यात आलेल्‍या तुरडाळीची आवक तालुका गोदामामध्‍ये झालेली आहे. परंतु माहे एप्रिल ते जून-2020 करीता मागणी करण्‍यात आलेल्‍या चणाडाळीपैकी 37.500 मे. टन चणाडाळीचा पुरवठा झालेला नाही. 
              शासनाकडून पंतप्रधान गरीब कल्‍याण अन्‍न योजनेअंतर्गत (PMGKAY) माहे एप्रिल ते जून-2020 या कालावधीसाठी सावंतवाडी गोदामात मंजूर नियतनानुसार तूरडाळ - 59 मे. टन व चणाडाळ - 25.750 मे. टन प्राप्‍त झाली आहे. तालुका गोदामात प्राप्‍त झालेल्‍या तूरडाळ व चणाडाळीचे त्‍वरीत वितरण करण्याबाबत सर्व तहसिलदार यांना सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. त्याअनुषंगाने सावंतवाडी गोदामात प्राप्‍त डाळींचे वितरण करण्‍यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते हे कळवितात.
0000



Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'