सावंतवाडी येथील 70 वर्षीय कोरोना बाधीत वृद्धाचा मृत्यू जिल्ह्यात एकूण 55 सक्रीय रुग्ण - जिल्हा शल्य चिकित्सक
सावंतवाडी येथील 70 वर्षीय कोरोना बाधीत वृद्धाचा मृत्यू
जिल्ह्यात एकूण 55 सक्रीय रुग्ण
- जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 15 - सावंतवाडी येथील 70 वर्षीय कोरोनाबाधीत वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 अशी झाली आहे. सदर वृद्ध हा दिनांक 10 जून 2020 रोजी मुंबई येथून आला होता. त्यास मधुमेह, उच्चरक्तदाब, श्वसनदाह असे आजार होते अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
जिल्ह्यात आज आणखी 10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 94 झाली आहे. तर जिल्ह्यात आजमितीस 55 सक्रीय रुग्ण आहेत.
अ.क्र. विषय संख्या
1 पाठविण्यात आलेले एकूण नमुने - 2,976
2 अहवाल प्राप्त झालेले नमुने- 2, 901
3 आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने - 154
4 निगेटीव्ह आलेले नमुने- 2,747
5 अहवाल प्राप्त न झालेले नमुने - 75
6 सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण - 55
7 इतर जिल्हे व इतर राज्यातील रुग्ण-1 (मुंबई)
8 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या - 4
9 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण - 94
10 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण - 84
11 आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती - 4,197
12 संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती - 17,927
13 शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती - 146
14 गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती - 15,968
15 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती - 1,813
16 दि. 2 मे 2020 रोजीपासून आतापर्यंत जिल्ह्यात दाखल
व्यक्ती - 96,172
00000
Comments
Post a Comment