कणकवली तालुक्यातील कळसुली येथे कंटेन्मेंट झोन/ कुणकेश्वर मधील तळीवाडी कंटेन्मेंट झोन जाहीर / सावंतवाडी तालुक्यात आणखी दोन कंटेन्मेंट झोन /कुडाळ तालुक्यात आणखी दोन कंटेन्मेंट झोन / मालवण तालुक्यात कट्टा व तळगाव येथे कंटेन्मेंट झोन /
कणकवली तालुक्यातील कळसुली येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 11 : कणकवली तालुक्यातील कळसुली येथील गडगेवाडी हा कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याठिकाणी 40 घरांमध्ये 41 कुटुंब असून लोकसंख्या 97अशी आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी येथे दिनांक 23 जून 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
तसेच याच तालुक्यातील मौजे असलदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असलदे तावडेवाडी आणि आवार, दि. 23 जून 2020 रोजीपर्यंत कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये 3 कुटुंबातील 12 लोकांचा समावेश होतो. या दोन्ही कंटेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री या दिनांक 23 जून 2020 रोजी पर्यंत बंद राहतील. तसेच या क्षेत्रात नागरिकांचे येणे व जाणे तसेच वाहनांना प्रवेश बंद असणार आहे असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
कुणकेश्वर मधील तळीवाडी कंटेन्मेंट झोन जाहीर
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 11 : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मधील तळीवाडी येथील एक घर व त्याचा परिसर हा कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर क्षेत्रामध्ये सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तूविक्री हे व्यवहार दिनांक 13 जून 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रात नागरिकांचे येणे व जाणे तसेच वाहनांना प्रवेश बंद असणार आहे असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
सावंतवाडी तालुक्यात आणखी दोन कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 11 : सावंतवाडी तालुक्यातील मौजे निरवडे- भंडारवाडी परिसर आणि मौजे गाळेल येथील जिल्हा परीषद शाळा मधलीवाडी परिसर ही दोन क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या दोन्ही क्षेत्रांमध्ये दिनांक 24 जून 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तूविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच या क्षेत्रांमध्ये नागरिकांचे येणे व जाणे तसेच वाहनांच्या प्रवेशास बंदी असल्याचे आदेश सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.
00000
कुडाळ तालुक्यात आणखी दोन कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 11 : कुडाळ तालुक्यातील मौजे वेताळबांबर्डे येथील दारवळवाडी, पावणाई टेंब व मौजे नेरुर येथील सावूळवाडी या दोन्ही क्षेत्रांच्या 500 मीटर परिघ क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही बाधीत क्षेत्रांमध्ये दिनांक 23 जून 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तुविक्री यावर बंदी असेल. तसेच नागरिकांना या क्षेत्रामध्ये जाता येणार नाही अथवा बाहेरही पडता येणार नाही. कोणत्याही वाहनास या क्षेत्रामध्ये प्रवेशास मनाई असल्याचे आदेश कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.
00000
मालवण तालुक्यात कट्टा व तळगाव येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 11 : मालवण तालुक्यातील मौजे कट्टा येथील वाईकरवाडी, वरची गुरामवाडा येथे आणि मौजे तळगाव – काठापूरवाडी येथे कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही बाधीत क्षेत्रांच्या 300 मीटर परिघामध्ये दिनांक 21 जून 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तूविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच या क्षेत्रांमध्ये नागरिकांचे येणे व जाणे तसेच वाहनांच्या प्रवेशास बंदी असल्याचे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.
00000
Comments
Post a Comment