कणकवली तालुक्यातील ओझरम, आशिये व मालवण तालुक्यातील चुनवरे येथे कंटेन्मेंट झोन
कणकवली तालुक्यातील ओझरम येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनरी ( जि.मा.का) दि. 27 : कणकवली तालुक्यातील मौजे ओझरम पिंपळवाडी येथील 1.5 कि. मी. परीसरातील 44 घरामधील 34 कुटुंबातील 117 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 9 जुलै 2020 रोजीपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरीकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
कणकवली तालुक्यातील आशिये येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनरी ( जि.मा.का) दि. 27 : कणकवली तालुक्यातील मौजे आशिये खानोलकरवाडी येथील 9 घरे 14 कुटुंबे 40 लोकसंख्या, ठाकूरवाडी-गार्गी सत्यवान नेमळे यांच्या घरापर्यंत 46 घरे 48 कुटुंबे 180 लोकसंख्या, समर्थनगर नवीनवसाहत राजेश महादेव आजगांवकर घरापर्यंत 38 घरे 26 कुटुंबे 160 लोकसंख्या असे एकूण 93 घरे 88 कुटुंबे व 380 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 9 जुलै 2020 रोजीपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरीकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
मालवण तालुक्यातील चुनवरे येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनरी ( जि.मा.का) दि. 27 : मालवण तालुक्यातील मौजे चुनवरे गावठाणवाडी येथील 300 मीटर परीसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 9 जुलै 2020 रोजीपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरीकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही, असे आदेश कुडाळ उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.
00000
Comments
Post a Comment