जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी 85 अहवाल आले निगेटीव्ह

जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्तींचे
कोरोना अहवाल पॉजिटीव्ह
-         जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
85 अहवाल आले निगेटीव्ह
जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील पुढील प्रमाणे कंटेन्मेंट झोन आहेत. मौजे तळेरे, मौजे नाटळ, मौजे कुरंगवणे, मौजे नवीन कुर्ली वसाहत, मौजे जानवली गावातील घरटणवाडी येथील प्राथमिक शाळा, मौजे शेर्पे येथील बौद्धवाडी, शिवडाव, डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, मौजे हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, मौजे बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कुल व आवार, मौजे कासार्डे येथील धुमाळवाडी, मौजे हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, मौजे बावशी येथील शेळीचीवाडी, मौजे पियाळी येथील गावठण. वैभववाडी तालुक्यात मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी, आणि उंबर्डे हे कंटेन्मेंट झोन आहेत. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावठणवाडी, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, मौजे निरवडे माळकरवाडी, मौजे बांदा गाव गवळीटेंबवाडी, मौजे असणिये येथील भट्टवाडी, धनगरवाडी, वायंणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी,  मौजे सातोसे-दुर्गवाडी या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत.  कुडाळ तालुक्यातील कंटेन्मेंट झोनची माहिती पुढील प्रमाणे आहे. पणदूर – मयेकरवाडी, आंब्रड गावची वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, मौजे पडवे गावची पडवे पहिलीवाडी, मौजे गावराई गावची टेंबवाडी, मौजे रानबांबूळी गावची पालकरवाडी. मालवण तालुक्यातील हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड हे कंटेन्मेंट झोन आहेत.
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 2 हजार 138 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 2 हजार 30 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 89 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 938 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 108 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 120 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 67 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 45 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये 8 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 7 हजार 351 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकूण 89 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 8 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 79 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.  2 मे 2020 पासून आज अखेर एकूण 70 हजार 77 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
कोवीड – 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सर्वांना लागू केली आहे. जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस, उप जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, कणकवली व शिरोडा, संजिवणी हॉस्पिटल, सावंतवाडी, सुयश हॉस्पिटल, कुडाळ, लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे, नागवेकर हॉस्पिटल, कणकवली, गुरुकृपा हॉस्पिटल, कणकवली, संजिवनी हॉस्पिटल, कणकवली, साईलिला हॉस्पिटल, नाटळ, गोवा मेडिलक कॉलेज हॉस्पिटल, बांबोळी, गोवा अशा 12 रुग्णालयांना लागू आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'