जिल्ह्यात आणखी 3 कोरोना बाधीत व्यक्ती
एकूण रुग्णसंख्या 116
- जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 06 - जिल्हा सामान्य रुग्णालयास आज प्राप्त 28 कोरोना तपासणी अहवालामध्ये 3 अहवाल पॉजिटीव्ह तर 25 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 1 रुग्ण पडवे ता. कुडाळ, 1 रुग्ण कारिवडे, ता. सावंतवाडी तर 1 रुग्ण कुंब्रल ता. दोडामार्ग येथील आहे.
जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील पुढील प्रमाणे कंटेन्मेंट झोन आहेत. मौजे हळवल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळवल नं. 1, मौजे कलमठ येथील जि.प. प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडी, मौजे तळेरे, मौजे नाटळ, मौजे कुरंगवणे, मौजे नवीन कुर्ली वसाहत, मौजे जानवली गावातील घरटणवाडी येथील प्राथमिक शाळा, मौजे शेर्पे येथील बौद्धवाडी, शिवडाव, डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, मौजे हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, मौजे बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कुल व आवार, मौजे कासार्डे येथील धुमाळवाडी, मौजे हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, मौजे बावशी येथील शेळीचीवाडी, मौजे पियाळी येथील गावठण. वैभववाडी तालुक्यात मौजे भूईूबावडा गावातील बौद्धवाडी, पहिलीवाडी, तळीवाडी, मौजे वेंगसर गावातील बंदरकरवाडी, मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी, आणि उंबर्डे हे कंटेन्मेंट झोन आहेत. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावठणवाडी, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, मौजे निरवडे माळकरवाडी, मौजे बांदा गाव गवळीटेंबवाडी, मौजे असणिये येथील भट्टवाडी, धनगरवाडी, वायंणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी, मौजे सातोसे-दुर्गवाडी या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. कुडाळ तालुक्यातील कंटेन्मेंट झोनची माहिती पुढील प्रमाणे आहे. पणदूर – मयेकरवाडी, आंब्रड गावची वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, मौजे पडवे गावची पडवे पहिलीवाडी, मौजे गावराई गावची टेंबवाडी, मौजे रानबांबूळी गावची पालकरवाडी. मालवण तालुक्यातील मौजे चिंदर येथील देऊळवाडी, गावडेवाडी, शाळा गावठाणवाडी, बागवाडी, गोसावी मठ, हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड हे कंटेन्मेंट झोन आहेत. देवगड तालुक्यातील मौजे शिरगाव मधील धोपटेवाडी, मौजे नाद मधील भोळेवाडी, मौजे नाडन येथील मिराशीवाडी असे कंटेन्मेंट झोन आहेत.
अ.क्र
विषय
संख्या
1 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 2481
2 अहवाल प्राप्त झालेले नमुने 2332
3 आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 116
4 निगेटीव्ह आलेले नमुने 2216
5 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 149
6 सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 96
7 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण17
8 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2
9 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 123
10 आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 5287
11 निरीक्षणाखालील व्यक्ती 44637
12 गृह अलगीकरणातील व्यक्ती 13399
13 संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 31787
14 14 दिवसांचे अलगीकरण संपलेल्या व्यक्ती 20706
15 रुग्णालयात दाखल झालेल्या एकूण व्यक्ती 1329
16 रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या व्यक्ती 1225
17 जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन 58
18 सक्रिय कंटेन्मेंट झोन 54
19 असक्रिय कंटेन्मेंट झोन 4
20 दि. 2 मे 2020 रोजी पासून जिल्ह्यात आलेल्यांची संख्या 77278
00000
Comments
Post a Comment