कणकवली तालुक्यातील जानवली येथे कंटेन्मेंट झोन / शेतकऱ्यांनी कलमे किंवा रोपे अधिकृत परवानाधारकांकडून खरेदी करावीत
सिंधुदुर्गनरी ( जि.मा.का) दि. 29 : कणकवली तालुक्यातील मौजे जानवली येथील सुजय लक्ष्मण साटविलकर घर व परिसर 100 मीटरमधील 30 घरे, 33 कुटुंबे व 129 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 11 जुलै 2020 रोजीपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरीकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
शेतकऱ्यांनी कलमे किंवा रोपे
अधिकृत परवानाधारकांकडून खरेदी करावीत
सिंधुदुर्गनरी ( जि.मा.का) दि. 29 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळझाडांची कलमे किंवा रोपे खरेदी करताना अधिकृत परवानाधारक रोपवाटीकेमधून करण्यात यावी. तसेच कलमे किंवा रोपे खरेदी केल्यांनतर विहित नमुन्यातील खरेदीची पावती संबंधित रोपवाटीकेकडून घ्यावीत, असे आवाहन सावंतवाडीचे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment