पल्स ऑक्सिमीटर व इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर मशिनच्या सहाय्याने पोलिसांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी /उद्योगांसाठी इंडस्ट्रि ह्यूमन रिसोर्स सर्व्हे 2020 सुरु


पल्स ऑक्सिमीटर व इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर मशिनच्या सहाय्याने
पोलिसांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 2 : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पोलिस दलामार्फत पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर व इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर मशिनच्या सहाय्याने आरोग्याची प्राथमिक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक यांनी दिली.
            देशात व राज्यात सध्या लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या कालावधित पोलिस दल सतर्कपणे दैनंदिन कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावताना पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा जनतेशी थेट संपर्क येत असतो. कळत नकळत पोलिस कोरोना विषाणू बाधित व्यक्तीच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची प्राथमिक तपासणी पल्स ऑक्सिमीटर व इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर मशिनद्वारे करण्यात येणार आहे.
             प्लस ऑक्सिमीटरच्या माध्यमातून रक्तातील हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहन क्षमता ओळखण्यास मदत होणार असून कोविड-19 रोगाचे प्राथमिक लक्षण असलेल्या तापाबाबतची माहितीही मिळणार आहे. त्यासाठी इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर मशीनचा उपयोग करण्यात येणार आहे. या मशीनच्या माध्यमातून शरिरातील तापमानाच्या नोंदी व रक्तातील ऑक्सिजनची नोंद घेण्यात येणार आहे. या नोंदी Sindhudurg Health Checlist Sindhu 50 Plus  या ऑनलाईन एक्सल शीट मध्ये नमूद करण्यात येतील. यामुळे अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिस दलाला त्याचा फायदा होणार आहे.
000000
उद्योगांसाठी इंडस्ट्रि ह्यूमन रिसोर्स सर्व्हे 2020 सुरु
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 2 : राज्यातील उद्योगांच्या मानव संसाधन व नगर संबंधित गरजा भागविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने इंडस्ट्रि ह्यूमन रिसोर्स सर्व्हे 2020 सुरु करण्यात आला आहे, माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी दिली.
            हा सर्व्हे 10 जून पर्यंत चालू राहणार असून या सर्व्हेबाबतची अधिक माहिती https://t.co/yxq3SXolE4 या लिंकवर देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व उद्योगांनी या लिंगवर जाऊन आपली माहिती भरुन अपलोड करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  
000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'