जिल्हाधिकारी यांनी बालगृहातील मुलांसमवेत केली दिपावली साजरी मुलांचा आनंद गगनात मावेना … चेहऱ्यावर फुलले हास्य

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का): बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या सोबत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिवाळी सण साजरा केला. दिपावली हा सण अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा उत्सव असून मुलांसोबत दिवाळी साजरी करतांना मला खुप आनंद झाल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले. जिल्हाधिकारी यांनी बालगृहातील बालकांच्या समवेत दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करुन संस्थेतील बालकांना व कर्मचांऱ्या शुभेच्छा दिल्या. दिपावली सणाचे औचित्य साधून संस्थेतील बालकांचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी बालकांच्या सोबत दिपावली फराळाचा आस्वाद घेवून बालकांचा आनंद व्दिगुणीत केला. यावेळी संस्थेतील सर्व बालके उत्साही व आनंदी झाली. जिल्हाधिकारी यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कर्मचारी हे सामाजिक भावनेतून योगदान देत असल्याने सर्वांचे कौतुक करुन समाधान व्यक्त केले. संसथेतील आयोजित कार्यक्रमामध्ये ओरोस सिधुदुर्ग येथील संगीत विशारद श्री. संजय दळवी व सहकारी यांच्यामार्फत बालकांसाठी संगीत भजन व गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी संस्थेतील बालकांना दिपावली निमित्त शुभेच्छा देवून संस्थेतील बालकांचे शिक्षण व व्यक्तिमत्व विकास व त्यांचे व पुर्नवसन याबाबत संस्था सतत सकारात्मक प्रयत्नशिल असल्याचे मत व्यक्त केले. तसेच दिपक दयाळ (कर्नल एन. सी. सी.), यांनी बालकांच्या चेहऱ्यावरील हास्य व बालकांची घेण्यात येणारी काळजी हिच खरी दिपावली असल्याचे मनोगत व्यक्त केले. बाल कल्याण समिती सदस्य अॅड. पणदुरकर यांनी दिपावली सणाचे महत्त्व सांगुन हा सण आपल्या सर्वांसाठी मांगल्याचा, तेजोमय दिप असल्याचे सांगितले. यावेळी समिती सदस्या माया रहाटे यांनी बालक हा समाजामधील महत्त्वाचा घटक असून बालकांचे संरक्षण करणे व त्यांचा विकास हाच दिपावली सणाचा आनंद असल्याचे सांगितले. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी महिला व बाल विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी हे बालकांचे हक्क व संरक्षण अबाधित राहण्यासाठी कार्य करीत आहे. एकात्मिक बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन, समुपदेशन केंद्रे, सखी वन स्टॉप सेंटर तसेच शासकिय बालगृहे व महिला राज्यगृहे या सारख्या यंत्रणा बहुमुल्य योगदान देत आहे. संस्थेत दाखल झालेल्या बालकांचे जीवन प्रकाशमय होत असुन कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. आयोजित कार्यक्रम हा संस्थेतील आजी माजी बालकांसाठी संस्थेकडे पुन्हा चला (बॅक टु इन्स्टियूट) या उपक्रमातंर्गत घेण्यात आला. यामध्ये माजी प्रवेशित यांनी सहभाग घेवुन संस्थेतील अधिकारी व कर्मचारी व बालकांचे मित्र यांच्याशी संवाद साधून संस्थेमधील जडण - घडण व अनुभवाचे देवाण घेवाण करुन हितगुज केले. यामुळे बालकांना चांगली दिशा व योग्य प्रेरणा मिळत असल्याबाबत बालकांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमास सामाजिक भावनेतुन उपस्थित प्रशासकिय अधिकारी, तसेच समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी बालकांचे औक्षण करुन भेटवस्तु व दिपावलीचा फराळ देण्यात आला. या प्रसंगी महिला व बाल विकास विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अनिल पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख आदी उपस्थित होते.तसेच मान्यावरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन दिपोत्सव साजरा केला. कार्यक्रमास बाल न्याय मंडळाचे सदस्या कृतिका कूबल, बाल कल्याण समिती सदस्या, नम्रता नेवगी, प्रा.श्री अमर निर्मळे, अॅड पणदुरकर, प्रा. श्रीम. माया रहाटे, संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य सुभाष बांबुळकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, विशेष शिक्षक संतोष देसाई, डायट विभागाचे श्रीम. पेडणेकर, एन. सी. सी. कर्नल दिपक दयाळ, जिल्हा परिषद चे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आदी मान्यवर व बहुसंख्येने कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आयोजित कार्यक्रमाचे नियोजन संस्था अधिक्षक तथा जिल्हा परिविक्षा अधिकारी बी. जी. काटकर यांनी केले. शेवटी समुपदेशक श्रीम. स्वाती पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'