पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी रोजी
सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ 8वी) दिनांक 09 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी आवेदन पत्र ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी केले आहे.
शाळा माहिती प्रपत्र, नियमित शुल्कासह ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनांक 17 ओक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 असा आहे. शाळा माहिती प्रपत्र, विलंब शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनांक 1 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 असा आहे. शाळा माहिती प्रपत्र, अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनांक 16 डिसेंबर 2024 ते 23 डिसेंबर 2024 असा आहे. शाळा माहिती प्रपत्र, अति विशेष विलंच शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनांक 24 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 असा आहे.
दिनांक 31 डिसेंबर 2024 नंतर कोणत्याही परिस्थितीत ओनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. परीक्षेचे वेळापत्रक, स्वरूप, पात्रता निकष, परीक्षेचे माध्यम, परीक्षेचे शुल्क भरण्याची पध्दत इल्यादी व इतर बाबी विषयीची सूचना परीक्षेच्या अधिसूचनेत परिषदेच्या www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
०००००
Comments
Post a Comment