जागतिक ह्दय रोग दिन व जागतिक वृध्दापकाळ दिन संपन्न
सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक हृदय रोग दिन व जागतिक वृध्दापकाळ दिन संपन्न झाला, असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.
जागतिक हृदय रोग दिनानिमित्त एनसीडी स्टाफ नर्स तृप्ती जाधव यांनी हृदय रोगाची लक्षण तसेच हृदय रोगाची कारणे या बाबत उपस्थित लाभार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. तसेच एनसीडी कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्हा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालये, प्रा. आ. केंद्र व उपकेंद्र याठिकाणी लाभार्थ्यांनी उच्चरक्तदाब, मधुमेह, तमेष मुखाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर या बाबतची तपासणी केली जाते या विषयी माहिती दिली. एनसीडी कार्यक्रम अंतर्गत नव्याने स्टेमी कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र , उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे लाभार्थोकरीता ईसीजी निशूल्क स्वरुपात काढले जातात.
जागतिक वृध्दापकाळ दिन कार्यक्रमाचे उद्द्घाटन डॉ. सुबोध इंगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क गट-अ) यांच्या हस्ते करण्यात आले.
जेष्ठ नागरिक दिनानिमित्त एनपीएचसीई स्टाफ नर्स अनिता बिबवणेकर यांनी जेष्ठ नागरीकांच्या आरोग्य विषयक काळजी बाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. चेतना चुबे यांनी आहार व व्यायामाविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा रुग्णालयांच्या माध्यमातून जागतिक वृध्दापकाळ दिनाचे औचित्य साधुन आनंदाश्रय अणाव येथे जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विषयक तपासणी शिबीर घेण्यात आले. या कॅम्पला 31 लाभार्थी उपस्थित होते. सर्व जिल्यातील आरोग्य संस्थेमध्ये जागतिक हृदय रोग दिन व जागतिक वृध्दापकाळ दिन साजरे करण्यात आले.
जागतिक हृदय रोग दिनाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला अति जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्याम पाटील, डॉ. सुबोध इंगळे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क गट-अ), डॉ चुबे, डॉ. गणेश तसेच जिल्हा एनसीडी समन्वयक केतन कदम, एनटीसीपी समन्वयक संतोष खानविलकर, सामाजिक कार्यकर्ता कार्मिस अल्मेडा, एनसीडी विभागाचे स्टाफ नर्स तृप्ती जाधव सायली वेंगुर्लेकर, प्रियांका चव्हाण, सोनाली पावसकर, स्नेहा परब, श्रध्दा सावंत, शिल्पा दळवी, रुपाली परब, रेश्मा नाणचे, अनिता बिबवणेकर, प्रियांका राउळ नुतन मसगे, सुरभि कामले, एम टी डब्लू,सोमा कांबळे तसेच एनसीडी विभागाचे कर्मचारी सुयश सावंत, आदी उपस्थित होते.
०००००००
Comments
Post a Comment