संवेदनशील क्षेत्र घोषित गावांना आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशीन क्षेत्र घोषित करण्यासाठी क्र. So३०६० (इ) दि.31 जुलै 2024 अन्वये मसूदा अधिसूचना जारी केलेली आहे. सदर अधिसूचना https://egazette.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रस्तूत मसूदा अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील 13 जिल्हे व 56 तालुके अंतर्गत 2515 गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. त्यापैकी सिधुदुर्ग जिल्ह्यातीत सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी या 5 तालुक्यातील 198 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्यातील पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केल्यास ज्या स्थानिक रहिवासीना त्याचा परिणाम होणार आहे, त्यांनी Environment Protection Act, 1986 व नियम 1986 मधील तरतूदीनुसार त्यांचे आक्षेप 60 दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली- 110003 यांचेकडील esz-mef@nic.in या ईमेल आयडीवर आक्षेप नोंदविणे आवश्यक आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'