मुद्रणालय चालकांनी माहिती देणे बंधनकारक
सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 निवडणूक कालावधीत मुद्रणालयामध्ये विषयांकित कोणत्याही प्रकारचे मुद्रण होत असेल तर त्याची माहिती मुद्रणालय चालकाने निवडणूक कार्यालय सिंधुदुर्ग यांना देणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे समन्वय अधिकारी अमित मेश्राम यांनी दिली आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 कलम 127 (क) नुसार कोणतीही व्यक्ती मुद्रक व प्रकाशकाचे नाव व पत्ता नमूद केल्याशिवाय आणि दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेल्या प्रकाशकाकडून प्रतिज्ञापत्र घेतल्याशिवाय कोणतेही निवडणूक पत्रके किंवा भित्तीपत्रक, हस्तपत्रके किंवा अन्य कागदपत्रांचे मुद्रोत करणार नाही किंवा प्रकाशित करणार नाही किंवा मुद्रीत करण्याची किंवा प्रकाशित करण्याची व्यवस्था करणार नाही. कागदपत्रांच्या मुद्रणानंतर वाजवी वेळेत कागदपत्रांच्या प्रतींसह प्रतिज्ञापत्राची प्रत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यास / मुख्य निवडणूक अधिकाऱ्यास देण्याची जबाबदारी अशा मुद्रणालयाची आहे.
०००००
Comments
Post a Comment