जिल्ह्यात 29 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत यलो अलर्ट

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): जिल्ह्यात दि. 29 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2024 या कालावधीत यलो अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच ढगांचा गडगडाट होवून विजा चमकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर 'दामिनी APP' डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकणी आसरा घ्या. अतिमुसळधार पावसात व अतिवृष्टीच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करु नका. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. नियंत्रण कक्ष व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे जिल्हा नियंत्रण कक्ष – 02362-228847 किंवा टोल फ्री 1077, 7498067835. पोलीस नियंत्रण कक्ष- 02362-228614,8275776213 पोलीस टोल फ्री हेल्पलाईन-112,जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, 02362 228901,महावितरण, सिंधुदुर्ग नियंत्रण कक्ष,7875765019, दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष- 02363-256518, सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष- 02363-272028, वेंगुला तालुका नियंत्रण कक्ष- 02366-262053, कुडाळ तालुका नियंत्रण कक्ष- 02362-222525, मालवण तालुका नियंत्रण कक्ष- 02365-252045, कणकवली तालुका नियंत्रण कक्ष- 02367-232025, देवगड तालुका नियंत्रण कक्ष- 02364-262204, वैभववाडी तालुका नियंत्रण कक्ष- 02367-237239 या प्रमाणे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमाक आहे. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/mumbai/mcdata/district.pdf या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष ०२३६२-२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'