संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांसाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.२७ (जि.मा.का): संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मार्यादित यांच्यामार्फत अनुसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या (एन.एस.एफ.डी.सी, नवी दिल्ली) विविध योजना राबविल्या जातात. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची ई.) इच्छुक अर्जदारांकडून कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रविण जाहीर यांनी केले आहे. ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडलव योजना, मुदती कर्ज योजना, महिला समृध्दी योजना, लघुऋण वित्त योजना, महिला अधिकारीता योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सुविधा ऋण योजना, उत्कर्ष ऋण योजना, या योजनांचा लाभ घेण्यासठी अर्जदार हा चर्मकार (चांभार, ढोर, होलार व मोची ई.) समाजातील असावा. तसेच अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योयजेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पुर्ण पुर्तता करुन वरील शासकीय योजनेंचे तीन प्रतीत अर्जदाराने मुळ कागदपत्रांसह उपस्थित राहुन कर्ज प्रस्ताव दाखल करावेत. त्रयस्थ, मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणांचे अर्ज देण्यात अथवा स्विकरण्यात येणार नाहीत. कर्ज प्रस्तावसोबत अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे अर्ज पुर्ण भरलेला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (रु.३,००,०००/- पर्यंत), रहिवाशी दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक दाखला, तीन फोटो कॉपीज, लाभार्थाचा उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थाचा सिबील क्रेडीट स्कोअर (५००च्या पुढे असावा). ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेचा पुरावा (जागेचे लाईटबील, टॅक्स / भाडे पावती / भाडे करारनामा / जागा वापर संम्मतीपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा इ.). कागदपत्रे खरी असल्याबाबत लाभार्थ्याचा विनंती अर्ज व ज्या जागी व्यवसाय चालू आहे त्याच जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र. दोन सक्षम जामिनदार (नोकरदार किंवा मालमत्ताधारक / शेतकरी). सक्षम जामिनदारांपैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्याने वसुलीचा भरणा केला नाही तर जामिनदाराच्या पगारातून कपात करुन भरणा करण्यात येईल असे कार्यालयाचे हमीपत्र, ग्रामपंचायत, नगरपालिका अथवा महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल (सी.ए. यांच्या सही व शिक्क्यासहीत). खरेदी करावयाच्या मालमत्तेच्या साहित्याचे जी.एस.टी. क्रमांक असलेले दरपत्रक (कोटेशन) अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र (१०० च्या स्टॅम्पपेपरवर नोटरीसह), अर्जदाराचे तसेच जामिनदारांचे विहित नमुन्यातील शपथपत्रे रु १०० च्या स्टॅम्पपेपरवर नोटरीसह. अर्जदार विवाहित स्त्री असल्यास लग्नापुर्वीचे व लग्नानंतरच्या दोन्ही नावाची व्यक्ती ही एकच असल्याबाबत रु. १०० च्या स्टॅम्पपेपरवर नोटरीसही शपथपत्र. लाभार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न (Link) बँक खाते क्रमांक असलेल्या पासबुकची छायांकित प्रत. या योजनांचे कर्ज प्रस्ताव दि. २०/०९/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ए विंग ओरोस, सिंधुदुर्गनगरी या ठिकाणी सर्व योजनांचे कोरे अर्ज वाटप व स्विकारण्यात येतील. इच्छुक अर्जदारांनी सोबत येताना मुळ आधारकार्ड घेऊन येणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील समस्त चर्मकार समाज बांधवांनी (चांभार,ढोर,होलार व मोची इ.) महामंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रविण जाहीर यांनी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'