पी.एम. किसान पोटलवरील मोबाईल क्रमांकाची दुरुस्ती करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.२२ (जि.मा.का): पी.एम किसान योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करताना काही लाभार्थींनी चुकिचे मोबाईल क्रमांक नमुद केलेले आहेत. तरी अशा लाभार्थ्यांनी मोबाईल नंबर अद्यावत करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ पुर्वी दुरुस्तीची कार्यवाही करण्यात यावी, तरी आपला मोबाईल नंबर अद्यावत व दुरुस्ती करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. पी.एम.किसान योजनेसाठी नोंदणी करताना यापुर्वी लाभार्थ्यांचे एक मोबाईल क्र. अनेक नोंदणीसाठी वापरण्यात आलेले आहेत. तसेच पोर्टल डाटा अपलोड करताना चुकीचे मोबाईल क्रमांक देखील नमुद करण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने पी.एम. किसान पोर्टलवर Farmer Corner या पर्यायातील Update Mobile Number या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांची मोबाईल क्रमांकाची दुरुस्ती करण्यात यावी ही दुरुस्ती करण्यासाठी लाभार्थ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रवर किंवा मोबाईल ॲपव्दारे दुरुस्तीची कार्यवाही दि. ३१ ऑगस्ट २०२४ पुर्वी करावी, यानंतर ही सुविधा पोर्टलवर उपलब्ध राहणार नाही. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'