जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नवनियुक्त क्रीडा अधिकारी व क्रीडा मार्गदर्शक रुजु
सिंधुदुर्गनगरी, दि.२२ (जि.मा.का): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशान्वये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे नवनियुक्त क्रीडा अधिकारी २ व क्रीडा मार्गदर्शक २ हे नुकतेच रुजु झालेले आहेत.
नवनियुक्त क्रीडा अधिकारी यांचेपैकी राहुल रामचंद्र गायकवाड हे तलवारबाजी खेळाचे राष्ट्रीय खेळाडू तसेच सचिन नागनाथ रणदिवे हे धनुर्विद्या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू व धनुर्विद्या या खेळाचे राष्ट्रीय पंच (NIS) आहेत.
त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू श्रीम. श्रध्दा साईनाथ तळेकर व आंतरराष्ट्रीय क्रीडा कुस्ती प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू श्रीम. माधुरी गंगाराम घराळ या दोघी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे क्रीडा मार्गदर्शक म्हणून रुजु झालेल्या आहेत.
जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे नवनियुक्त झालेल्या क्रीडा मार्गदर्शकांकडुन तंत्रशुद्ध संबंधित खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या तंत्रशुद्ध मार्गदर्शनाकरिता आपली नोंदणी आशिष सावंत (९०२२५०७८०४) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment