एकविध खेळ संघटनांची २७ ऑगस्ट रोजी बैठक

सिंधुदुर्गनगरी, दि.२२ (जि.मा.का): शालेय क्रीडा स्पर्धा (जिल्हास्तर) आयोजन सन २०२४-२३ सिंधुदुर्ग जिल्हा (विनाअनुदानित) एकविध खेळ संघटनांची बैठक दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा.पुणे यांचे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय तसेच जिल्हा एकविध खेळ संघटना यांचे संयुक्त विद्यमाने सन २०२४-२५ या सत्रातील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजन करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालील नव्याने समावेश झालेल्या खेळ प्रकारातील अधिकृत राज्य संघटनेशी संलग्न जिल्हा एकविध खेळ संघटनांचे अध्यक्ष/सचिव यांची बैठक जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदु‌र्ग यांचे अध्यक्षतेखाली दि. ११ जुलै २०२४ रोजी सायं ४ वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली होती. तथापी याबैठकीस अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याने दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आलेली आहे. याबैठकीस उपस्थित राहतांना अधिकृत राज्य संघटनेला सलग्न असलेले पत्र तसेच वेळापत्रक सोबत आणावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी कळविलेले आहे. बेल्ट रेसलींग, पेन्टाक्यु, टार्गेटबॉल, रोप स्किपींग, स्पोर्ट डान्स, टेनिस व्हॉलीबॉल, फिल्ड आर्चरी, लंगडी, फुटबॉल टेनिस, सिलंबम, चॉयक्वांदो, टेबल सॉकर, थांग ता मार्शल आर्ट, मीनी गोल्फ, पॉवरलिफ्टींग, वूडबॉल, म्युजिकल चेअर, बुडो, लगोरी, स्पीडबॉल, ग्रॅपलिंग, बीच व्हॉलीबॉल, हाफकिडो बॉक्सींग, फुटसल, रस्सीखेच, युनिफाईट, कुडो, टेनीस क्रिकेट, सुपर सेव्हन क्रीकेट, चॉकबॉल, कॉर्फबॉल, मॉन्टेक्स बॉल क्रिकेट, वोवीनाम, जित कुने दो, आष्टे-डु-आखाडा, टेंग-सु-डो, हुपक्वॉन दो, कुराश, टेनिस बॉल क्रिकेट, ड्रॉप रोबॉल, थायबॉक्सींग, जंपरोप, युग मुन दो, फ्लोअरबॉल. वरील खेळ प्रकारातील संबंधित खेळाच्या संघटनानी याची नोंद घ्यावी. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'