शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि.14 (जि.मा.का.) : शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 15 ते 16 ऑगस्ट 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8.55 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस येथे आगमन. सकाळी 9.05 वाजता भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम स्थळ :- सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्गनगरी. सकाळी 10 वाजता श्री. मयुरेश कोले, डाक अधीक्षक सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी यांच्यासमवेत भेट स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. सकाळी 10.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी 12 वाजता सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ येथून मोटारीने सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी 1 ते 2 वाजता श्रीधर अपार्टमेंट, ता.सावंतवाडी येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता भरत कॅरम समारंभ कार्यक्रमास उपस्थिती स्थळ:- सबनिसवाडा, काझी शहाबुद्दीन हॉलजवळ सावंतवाडी .दुपारी 3 वाजता बाजारपेठ मित्रमंडळ सावंतवाडी आयोजित कब्बडी स्पर्धा -2024 कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- राणी पार्वती देवी हॉयस्कूल, सावंतवाडी .सायं. 4 वाजता सावंतवाडी हेल्थ वेलनेस सेंटर येथे सदिच्छा भेट स्थळ:- सावंतवाडी हेल्थ वेलनेस सेंटर जि.सिंधुदुर्ग . सोईनुसार श्रीधर अपार्टमेंट, सावंतवाडी येथे आगमन व राखीव. शुक्रवार दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10.15 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने ओरोस सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता ओरोस येथे आगमन व दि. 26 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार अंबोली गेळे, कबुलायतदार गावकर जमिनीच्य अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस. सकाळी 11.30 वाजता आकाश फिश मिल अँड फिश ऑईल प्रा. लि. केळूस ता. वेंगुर्ला या कंपनीमुळे होणाऱ्या त्रासाबाबत बैठक स्थळ :-जिल्हाधिकारी कार्यालय,ओरोस. दुपारी 12 वाजता सिंधुदुरत्न समृध्द योजना व चांदा ते बांदा योजनेबाबत आढावा बैठक स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस. दुपारी 2 वाजता सिंधुरत्न समृध्द योजनेंतर्गत बांदा, ता. सावंतवाडी येथे घाऊक मासे केंद्र उभारणेबाबत बैठक स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस. दुपारी 3 वाजता फुड सिक्युरिटी आर्मी, वेंगुर्लाबाबत बैठक स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस. दुपारी 3.30 वाजता वेत्ये ता. सावंतवाडी येथे कॉयर टपटींग युनिट उभारणेबाबत बैठक स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यायल, ओरोस. सायं. 4 वाजता सासोली ता. दोडामार्ग येथील कंपनीसंदर्भात बैठक स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस, सिंधुदुर्ग. सोईनुसार श्रीधर अपार्टमेंट, सावंतवाडी येथे आगमन व राखीव. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'