पालकमंत्र्यांच्या हस्ते रेल्वेस्थानक सुशोभिकरण लोकार्पण सोहळा · कणकवली, सिंधुदुर्गनगरी आणि सावंतवाडी येथे कार्यक्रम · मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र वाटप

सिंधुदुर्ग : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कणकवली, सिंधुदुर्गनगरी तसेच सावंतवाडी रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण व सुशोभिकरण कामाचा लोकार्पण कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ९ ऑगस्ट रेाजी होणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देखील वाटप करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान सभा सदस्य नितेश राणे, वैभव नाईक,जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शरद राजभोज, अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड आदी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता कणकवली रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामाचा लोकार्पण कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देखील वाटप , दुपारी १२:०० वाजता सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामाचा लोकार्पण कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देखील वाटप , दुपारी ०३:०० वाजता सावंतवाडी रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामाचा लोकार्पण कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देखील वाटप करण्यात येणार आहेत. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'