विशेष गौरव पुरस्कारसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.६ (जि.मा.का): सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्याकडून विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी दि. २० सप्टेंबर २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. या विशेष गौरव पुरस्कारासाठी एकरकमी रक्कम रुपये २५ हजार व रुपये १० हजार प्रदान केले जाणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय/ राज्यस्तरीय खेळातील प्रमाणपत्रधारक, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला क्षेत्रात राष्ट्रीय/ राज्यस्तरीय पुरस्कारधारक, पुर, जळीत, दरोडा, अपघात, नैसर्गिक आपत्ती (भुकंप/ वादळ) मध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार प्राप्त व्यक्ती, सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये शैक्षणीक क्षेत्रामध्ये आय.आय.टी, आय.आय.एम, ए.आय.आय.एम.एस अशा नामवंत ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळवणाऱ्या तसेच इयत्ता १० वी व १२ वी बोर्डाच्या परिक्षेमध्ये ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक यांची पाल्य यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग दूरध्वनी क्रमांक ०२३६२ २२८८२०/८४०८९६४९७५ यावर संपर्क करावा. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'