थकबाकीदार लाभार्थीनी एकरकमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा
सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का): महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय "ओबीसी" महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थीनी एकरक्कमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या.चे जिल्हा व्यवस्थापक प्रिती आर पटेल यांनी केले आहे.
इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. यांच्यामार्फत विविध कर्ज योजनेतंर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास ओबीसी प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे.
"ओबीसी" महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी या योजनेचा फायदा घेवून कर्जमुक्त व्हावे. असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
००००
Comments
Post a Comment